शेतकरी कर्जमाफी: अजित पवारांनी दिलं स्पष्टीकरण, वाचा काय म्हणाले?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर स्पष्टीकरण देताना, आर्थिक स्थिती सुधारल्यावर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा विचार करू, असं म्हटलं आहे. त्यांनी शेतकऱ्यांना 31 मार्च पूर्वी पीककर्जाचे पैसे भरण्याचं आवाहन केलं आहे.

  • अजित पवार यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना कर्जमाफीच्या विधानावर स्पष्टीकरण दिलं.
  • राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा विचार केला जाईल, असं अजित पवार म्हणाले.
  • शेतकऱ्यांनी 31 मार्च पूर्वी पीककर्जाचे पैसे भरावे, असं आवाहन अजित पवारांनी केलं.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर (Farmers Loan Waiver) केलेल्या विधानावर स्पष्टीकरण दिलं आहे. बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं. विधानसभेच्या निवडणुकीत महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनांवर त्यांनी भाष्य केलं.

अजित पवारांचं कर्जमाफीवर स्पष्टीकरण

अजित पवार म्हणाले, “काही लोकांनी माझ्यावर टीका केली. लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) चालू केली, त्यात सध्या 1500 रुपये देतो. परिस्थिती सुधारल्यावर 2100 रुपये देण्याचा विचार करू. मी 31 तारखेच्या आत पीक कर्ज भरण्यास सांगितलं, त्यावरुनही टीका झाली. जाहीरनाम्यात (manifesto) जरूर सांगितलं होतं, पण माझ्या एकाही भाषणात मी ते सांगितलं नव्हतं. माझी भाषणं काढून बघा. कारण मी उल्लेख केला होता की सगळी सोंगं करता येतात, पण पैशाचे सोंग करता येत नाही.”

विरोधकांवर टीका

अजित पवार पुढे म्हणाले, “विरोधक म्हणतात, ‘तुम्हाला घोषणा करताना आठवलं नाही का?’ टीका तर होणारच, पण राज्याला आर्थिक शिस्त पण लागली पाहिजे. ते नियोजन बिघडता कामा नये.”

अजित पवारांचं आवाहन

“लाडकी बहीण योजनेसाठी (Ladki Bahin Yojana) सुमारे 45 हजार कोटींचा बोजा सरकारने उचलला आहे. त्यामुळे कर्जमाफीसारखी (Farmers Loan Waiver) सध्या तरी आर्थिक स्थिती नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांसह कर्जदारांनी 31 मार्चपूर्वी बँकांमध्ये कर्जाची परतफेड करावी. काहींनी निवडणुकीदरम्यान जाहीरनाम्यात कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. जे सांगितलं, ते प्रत्यक्षात येत नाही. शेतकऱ्यांना माझं सांगणं आहे, की 31 तारखेच्या आत पीक कर्जाचे पैसे भरा,” असं आवाहन अजित पवारांनी (Ajit Pawar) केलं होतं.

highlights

घोषणातारीखअंतिम तारीख
लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा विचारNAआर्थिक परिस्थिती सुधारल्यावर
पीककर्जाचे पैसे भराNA31 मार्च पूर्वी

Leave a Comment